Share

‘मुख्यमंत्री पोलिसांचं कडंं घेऊन फिरतात, आपल्या यात्रेत मात्र महाराष्ट्राचा मावळा सामील आहे’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर टीका केली आहे. त्यांनी ‘आज अनेक यात्रा निघत आहेत पण मुख्यमंत्री पोलिसांचं कड घेऊन फिरत आहेत आणि एक आपली यात्रा जिथे पोलिसांचं कडं नसून महाराष्ट्राचा मावळा यात्रेत सामिल झालेला असतो. मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर फिरायची भीती वाटते. अशा शब्दात महाजनादेश यात्रेवर टीका केली आहे.

तसेच पुढे बोलताना कोल्हे यांनी फडणवीस यांच्यावर टीका करताना ‘नुसतीच सांगायला ५६ इंचाची छाती. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर चालण्याची भीती. शेतकरी अत्महत्येला ३०२ चा कलम दाखल करण्याची मागणी सत्तेत नसताना आजच्या मुख्यमंत्रीसाहेबांनी केली होती. मग आता १६००० शेतकरी आत्महत्या झाल्या. आता कोणावर कारवाई करायची. सव्वा लाख महिलांवर अत्याचार झाले आहेत अशा शब्दात मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

तसेच पुढे बोलताना २०१४ साली सत्तेसाठी शिवाजी महाराजांचे नाव वापरले. पण धुळ्यात हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवस्मारकाला मुख्यमंत्री गाडीतूनच वंदन करतात हीच यांची निष्ठा अशा शब्दात मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. तसेच कोल्हे यांनी यासह अनेक मुद्द्यांवरून सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागलेले आहेत. या निमित्ताने जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले आहे. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचाही समावेश आहे. या यात्रेतील गेवराई येथील सभेत अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!