🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: लिंगायत समाजाला देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 31ऑगस्टला सोलापूर येथील सभेत घोषित करतील, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. लातूरमध्ये आयोजित लिंगायत समाज राज्यव्यापी आरक्षण अधिवेशनात खैरे बोलत होते.
राज्यामध्ये लिंगायत बांधवांची संख्या एक कोटींच्या घरात आहे. त्यामुळे समाजाने एकत्र राहायला हवे. समाजात अनेक गरिब, दुर्लक्षीत लोक आहेत. या सर्वांना न्याय देण्याची भूमिका सरकार नक्कीच घेईल. सोलापूर येथे ३१ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांची सभा आहे. याच सभेत ते आरक्षणाबाबतचा निर्णय जाहीरपणे सांगतील, याची आपल्याला खात्री असल्याचं खैरे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, सत्तेवर येताच लिंगायत समाजाला आरक्षण देणार असल्याचं आश्वासन भाजपकडून देण्यात आले होते, परंतु पाच वर्षे उलटूनही सरकारकडून सकारात्मक पाऊले उचलली जात नसल्याने पुढील आठ दिवसांत निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा लिंगायत समाजाकडून देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
-
‘येत आहेत तेवढे भाजपात घ्या, पण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा रासपला द्या’
-
‘रावसाहेब दानवे म्हणजे तेलगु पिक्चरचं कॅरेक्टर’

