🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. त्यामुळे संसार उध्वस्त झालेले आहेत. तसेच अनेक लोक अद्यापही पुरात अडकलेले आहेत. पुरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
या पूरग्रस्तांसाठी सरकारने १५४ कोटी रुपयांचा निधी मदत म्हणून देण्यात येणार आहे. हा निधी थेट बँकांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती राज्य सरकारतर्फे देण्यात आली. हा निधी मृत व्यक्तींचे परिवार, जखमी तसेच पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाला कॉंग्रेसने विरोध दर्शवला आहे. कॉंग्रेसने पीडितांना बँकेच्या चकरा मारायला लावणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ‘आपत्तीत आजवर शासकीय मदत ही रोख दिली गेली. पण आता शासनाने मदत बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. लोकांचे संसार उद्धवस्त झाले असताना बँकेच्या वाऱ्या करायला लावणं योग्य नाही. शनिवार/रविवारी बँका बंद असतात अस सावंत यांनी म्हटले आहे. तसेच बँक व्यवस्थापन लोकांपर्यंत पोहचवा अशी विनंतीही सावंत यांनी केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने देखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे, पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी मिळून ५० लाख रुपयांची मदत पूरग्रस्तांना करणार असल्याची घोषणा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. तसेच बारामतीकरांनीही अवघ्या काही मिनिटांमध्ये मदतीचा हात पुढे करत पूरग्रस्तांसाठी १ कोटी रुपयांची व्यवस्था केली आहे.
कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्य सरकारशी बोलणार,मोदींचे पवारांना आश्वासन
सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ? आपत्तीतही सुरु आहे फडणवीस सरकारची जाहिरातबाजी
कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागातून अडीच लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

