टीम महाराष्ट्र देशा– आलमट्टी धरणातील विसर्ग पुरेशा प्रमाणात करण्याबाबत कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्य सरकारशी बोलणार असल्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना दिलं आहे. याबाबत पंतप्रधांनांनी हस्तक्षेप करावा अशी विनंती पवार यांनी काल केली होती. ‘कर्नाटक सरकारने मागणीप्रमाणे 5 लाख क्यूसेक्स प्रमाणात पाणी सोडत नसल्याने सांगलीतील पाणी पातळी जैसे थे आहे’, असं पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान,पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते पूरग्रस्त नागरिकांच्या भेटी घेणार आहेत. त्यांची विचारपूस करून शक्य ती मदत करणार आहेत. या भेटीत त्यांच्या सोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हेही असणार आहेत.
शरद पवार हे आज सकाळी ९ वाजता ते तांबावणे ता.फलटण, जि.सातारा येथील पुरग्रस्त भागाची पाहाणी व नागरिकांच्या भेटी घेणार आहेत. त्यानंतर दुपारी ३ वाजता पलुस, ता.जि.सांगली येथील पुरग्रस्त भागाची पाहाणी व नागरिकांच्या भेटी घेवुन त्यांना दिलासा देणार आहेत. सायंकाळी ५ वाजता ते सांगली येथील पुरग्रस्त व कॅम्पला ही भेट देणार आहेत.
दरम्यान,पश्चिम महाराष्ट्र आणि इतर भागातील पूरग्रस्त बाधितांना राज्य सरकारकडून 154 कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती काल मुंबईत देण्यात आली. यात ग्रामीण भागातील बाधितांना प्रत्येकी 10 हजार तर शहरी भागातील बाधितांना 15 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. रोगराई टाळण्यासाठी कोल्हापूर, सांगली आणि सातार जिल्ह्यात पुरेशी औषध व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिली.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर; श्रीनिवास पोफळे ठरला सर्वोत्कृष्ट बाल कलाकार
सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ? आपत्तीतही सुरु आहे फडणवीस सरकारची जाहिरातबाजी
ना शिंदे, ना चव्हाण महाराष्ट्रातला ‘हा’ नेता होणार कॉंग्रेसचा अध्यक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

