Share

राज्य सरकारच्या आलमट्टी धरणांतून पाणी सोडण्याच्या प्रस्तावाला कर्नाटक सरकारचा कानाडोळा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : कोल्हापूर – सांगली जिल्ह्यात महापुराने हाहाकार घातला आहे. तर सर्व जिल्ह्याचा ताबा पुराच्या पाण्याने घेतला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिक पाण्यात अडकले आहेत. या आपत्तीवर प्रशासन युद्धपातळीवर मदत करत आहे. ही भीषण आपत्ती महाराष्ट्रावर कर्नाटक सरकारच्या चुकीमुळे आली असल्याचं बोललं जात आहे. आलमट्टी धरणाच्या फुगवट्यामुळेचं पूरस्थिती निर्माण झाली असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे.

यानंतर आलमट्टी धरणातून पाणी सोडण्यासाठी कर्नाटक सरकारने मंजुरी दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. धरणातून पाच लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग होईल, असं म्हटलं जात होतं. परंतु कर्नाटक सरकारने ही मागणी गृहीत धरली आहे. कारण धरणातून तेवढा विसर्ग झालाच नसल्याची माहिती धरणाच्या अधिकृत वेबसाईटवर दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला कर्नाटक सरकार धुडकावत असल्याचं दिसत आहे.

पाच लाख क्युसेक पाणी सोडण्या ऐवजी आलमट्टीमधून साडेचार लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्याचा दावा मुख्यमंत्री कार्यालयाने ट्वीटद्वारे केला आहे. त्यामुळे आलमट्टी धरणातून नेमका किती पाण्याचा विसर्ग झाल आहे, यामध्ये साशंकता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान कोल्हापूर – सांगली जिल्ह्यात महापुराने हाहाकार घातला आहे. अनेक छोट्या – मोठ्या नद्या पात्र सोडून वाहत आहेत. तर सर्व जिल्ह्याचा ताबा पुराच्या पाण्याने घेतला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिक पाण्यात अडकले आहेत. या आपत्तीवर प्रशासन मदत कार्य करत आहे. मात्र प्रशासनाची बचाव यंत्रणा या विदारक परिस्थितीत ढेपाळली आहे. एका बाजूला मृतांचा आकडा वाढत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाची बचाव यंत्रणा तोकडी पडत आहे.

पुराचं पाणी २ दिवस घरात असेल तरचं मिळणार गहू आणि तांदूळ; सरकारचा अजब निर्णय

 

#कोल्हापूर – सांगली महापूर : ढेपाळलेल्या यंत्रणेवरून संतप्त नागरिकांनी महाजनांना विचारला जाब

 

महाजनांची सेल्फी म्हणजे ‘निर्लज्जम सदासुखी आणि निर्लज्जपणाचा कळस’ : तृप्ती देसाई

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!