🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : कोल्हापूर – सांगली जिल्ह्यात महापुराने हाहाकार घातला आहे. तर सर्व जिल्ह्याचा ताबा पुराच्या पाण्याने घेतला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिक पाण्यात अडकले आहेत. या आपत्तीवर प्रशासन मदत कार्य करत आहे. मात्र प्रशासनाची बचाव यंत्रणा या विदारक परिस्थितीत ढेपाळली आहे. अशाचं परिस्थितीत नेत्यांनी घटनास्थळी भेट देण्याचा धडाका लावला आहे. मात्र पूरग्रस्त संतप्त नागरिकांनी नेत्यांना चांगलेचं धारेवर धरले आहे. तर शेवटचा नागरिक जो पर्यंत सुरक्षित ठिकाणी येत नाही तो पर्यंत तुम्ही जायचं नाही अशी तंबी नागरिकांनी मंत्र्यांना दिली आहे.
भाजप नेते गिरीश महाजन आज सांगलीतील पूरग्रस्त भागाचा आढावा घेत आहेत. महाजनांचा हा आढावा दौरा चांगलाचं गाजला आहे. तर महाजन यांच्या दौऱ्याने सरकारची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. महापूराचा आढावा घेयला जाणाऱ्या महाजनांनी छोटी ट्रीप एन्जोय केली आहे. तर बोटीत बसून सेल्फी आणि फोटो काढण्याचा आनंद देखील घेतला आहे. यामुळे महाजन चांगलेच ट्रोल आहेत. तर सांगलीतील नागरिकांनी ही महाजन यांना घेराव घालत गावातील सगळे पुरग्रस्त सुखरुप पोहोचल्याशिवाय तुम्हाला इथून जाऊ देणार नाही अशी तंबी दिली आहे.
तसेच या नागरिकांनी पिण्याचे पाणी देखील तुम्ही उपलब्ध करून दिली नसल्याची तक्रार केली आहे. तर ढेपाळलेल्या बचाव यंत्रणेचा तीव्र निषेध केला आहे. राज्यावर प्रचंड मोठी आपत्ती आली आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याचा ताबा पुराच्या पाण्याने घेतला आहे. या जिल्ह्यांमध्ये विदारक परिस्थिती आहे. एका बाजूला मृतांचा आकडा वाढत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाची बचाव यंत्रणा तोकडी पडत आहे. एनडीआरएफ, नौदल, वायूदल आणि आर्मी या तिन्ही लष्करी यंत्रणा देखील बचाव कार्यास उतरल्या आहेत. तरी देखील परिस्थिती हाताबाहेर आहे. प्रशासन हतबल झाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.
पुराचं पाणी २ दिवस घरात असेल तरचं मिळणार गहू आणि तांदूळ; सरकारचा अजब निर्णय
महाजनांची सेल्फी म्हणजे ‘निर्लज्जम सदासुखी आणि निर्लज्जपणाचा कळस’ : तृप्ती देसाई
महापूर सेल्फीनंतर महाजनांनी पाण्यात उतरून घेतला आढावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

