Share

महापूर सेल्फीनंतर महाजनांनी पाण्यात उतरून घेतला आढावा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : भाजप नेते गिरीश महाजन महापूर सेल्फीमुळे सकाळ पासून समाज माध्यमांमध्ये ट्रोल होत आहेत. पूर परिस्थितीत त्यांनी छोटी ट्रीप एन्जोय केल्याची टीका विरोधकांनी केली आहे. विरोधाकंचे टोले खाल्यानंतर सत्ताधारी पक्षाचे नेते गिरीश महाजन भानावर आले आहेत. त्यांनी सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा पाण्यात उतरून आढावा घेतला आहे.

त्यांनतर त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून विरोधकांना टोला मारत मदतीच आवाहन केले आहे. गेल्या ४ दिवसांपासून मदत न मिळालेल्या गावांत आज पोहोचलो.मदतकार्याचे राजकारण करणाऱ्या विरोधी पक्षांतील नेत्यांना मी विनंती करतो की आपले घरात बसून टीका-ट्रोलिंग करत मनोरंजन झाले असेल तर येऊन प्रत्यक्ष मदतकार्यात सहभागी व्हावे!, असे ते म्हणाले आहेत.

भारतीय सैन्यदलाच्या मदतीने गिरीश महाजन हे पूरग्रस्त गावात पोहचले. तेथे अडकलेल्या गावकऱ्यांना रेस्क्यू केलं. मात्र या आधी महाजन यांची असंवेदनशीलता एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आली होती. पूरग्रस्त जिल्ह्याच्या पाहणीसाठी निघालेल्या गिरीश महाजन यांनी चक्क सेल्फीसाठी पोझ देत, हातवारे करत जणू पर्यटन सहलीचाचं आनंद घेतला आहे.

दरम्यान कोल्हापूर – सांगली जिल्ह्यात महापुराने हाहाकार घातला आहे. तर सर्व जिल्ह्याचा ताबा पुराच्या पाण्याने घेतला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिक पाण्यात अडकले आहेत. या आपत्तीवर प्रशासन मदत कार्य करत आहे. मात्र प्रशासनाची बचाव यंत्रणा या विदारक परिस्थितीत ढेपाळली आहे. अशाच परिस्थितीत नेत्यांनी घटनास्थळी भेट देण्याचा धडाका लावला आहे.

बहिणींना माहेरच्या आधाराची गरज, चला सगळे मिळून संसार उभा करूया : जितेंद्र आव्हाड

 

उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीला खिंडार, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर

 

बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या पूरग्रस्त भागात २८ टीम कार्यरत – सुभाष देशमुख 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!