🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: केंद्र सरकारकडून जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला आहे. कलम ३७० आणि ३५ A हटवण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी काश्मीरमध्ये रिसॉर्ट आणि हॉस्पिटॅलीटी इंडस्ट्री उभारणार असल्याची घोषणा केली, रावल यांच्या घोषणेवर टीका करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, ‘काश्मीरमध्ये जमिनी घेण्याची घाई का ?’ असा सवाल केला आहे.
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्यापूर्वी खोऱ्यातील लोकांना विश्वासात घेणे महत्वाचे होते, सरकार तिकडचे लोक आनंद व्यक्त करत असल्याचं सांगते, मात्र तिकडे ४० हजार सैन्य पाठवण्यात आलं आहे, संपूर्ण इंटरनेट बंद केलं ते कसं दिसणार? असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला आहे.
जम्मू काश्मीरच काय, तर ईशान्य भारतातही बाहेरच्या व्यक्तीला जमीन विकत घेता येत नाही. महाराष्ट्रातही शेतकरी नसलेल्यांना कृषी जमीन खरेदी करता येत नाही ही वस्तूस्थिती आहे. मग राज्य सरकार कश्मीरमधे जाऊन गुंतवणुक करण्याची घाई कशाला करत आहे, असा खोचक टोलाही शरद पवार यांनी लगावला आहे.
घटनेतील ३७० कलम हटवण्याच्या मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाचे हे आहेत फायदे
१) काश्मिरसाठीची वेगळी घटना व झेंडा संपुष्टात
२) काश्मिरात मालमत्ता विकत घेण्याचा आता भारतीयांना अधिकार
३) काश्मिरी नागरिकांचे दुहेरी नागरिकत्व यापुढे संपुष्टात
४) भारतीय संसद यापुढे काश्मिरसाठीही सर्वोच्च ठरणार
#महापूर : सांगलीच्या कारागृहात पुराचे पाणी, ३९० कैदी अडकले,दोघे पळाले
कलम ३७० वर तात्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
सरकार दोन समाजामध्ये भांडण लावून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतंय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

