🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा याठिकाणी अनेक गावं पुराच्या पाण्यात बुडाली आहेत. जवळपास ५० हजारांहून अधिक लोकांना प्रशासनाकडून सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं आहे. तर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय लष्कर, नौदल, एअरफोर्स आणि एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आलं आहे.
सांगलीत आलेल्या पुराचा फटका आता तेथील कैद्यांनाही बसला आहे. सांगलीच्या जेलमध्येही पुराचे पाणी शिरले आहे. या जेलमध्ये एकूण ३९० कैदी आहेत. त्यांना तेथून बाहेर काढण्यासाठी बोटी उपलब्ध करुन द्या, अशी मागणी जेलर यांनी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
दरम्यान,तुरुंगाच्या जवळ असलेल्या पटवर्धन हायस्कूलमध्ये आता या कैद्यांची रवानगी करण्याची तयारी सुरु आहे. विशेष म्हणजे, महापुराच्या पाण्यात अडकल्याचा फायदा घेत दोघा कैद्यांनी कारागृहातून पळ काढला. दोघांपैकी एका कैद्याला पोलिसांनी पकडलं असून दुसऱ्याचा शोध आहे.
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील ब्राम्हणाळ गावामध्ये आलेल्या महापुरात बचावकार्य करणारी बोट उलटून १० – १२ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. पलूस तालुक्यात असणाऱ्या ब्राम्हणाळ गावामध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना घेऊन जाणारी बोट पाण्याचा प्रवाह वाढल्याने अचानक उलटली, यामध्ये ३० च्या आसपास नागरिक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बोटमध्ये असणाऱ्या इतर लोकांचा शोध घेतला जात आहे.
कोल्हापूरसाठी वाट्टेल ती मदत करायला उतरलोय, खा संभाजीराजे धावले पूरग्रस्तांच्या मदतीला
कलम ३७० वर तात्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
महाजनादेश यात्रेला काळे झेंडे दाखवले जात आहेत तर आमच्या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

