टीम महाराष्ट्र देशा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक गावं पाण्यात बुडाली आहेत. कोल्हापूर, सांगली आणि सातार जिल्ह्यात परिस्थिती अतिशय विदारक आहे. हजारो नागरिक पाण्यात अडकले आहेत. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. तर एनडीआरएफ, आर्मी आणि नौदलाची पथक आपतग्रस्त भागात तैनात आहेत.
पुरात अडकलेल्या नागरिकांची संख्या हजारो असल्याने तैनात केलेली पथकं कमी पडत आहेत. त्यामुळे पंजाबमधील एनडीआरएफची पाच पथकं कोल्हापूर – सांगलीकडे रवाना झाली आहेत. तसेच नौदल आणि आर्मीकडून देखील प्रशिक्षित जवानांच्या मार्फत बचाव कार्य सुरु आहे. गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे भीमा, कृष्णा, पंचगंगा आणि इतर नद्यांना पुरा आला आहे. त्याचबरोबर कोयना धरणामधून देखील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे नद्या ह्या दुथडी भरून वाहत आहेत. तर काही नद्या पात्र सोडून प्रवाही झाल्या आहेत.
बचावकार्य सुरु असताना काही दुर्घटना घडत आहेत. अनेकदा बोट उलटून नागरिक खोल पाण्यात पडत आहेत. यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. दुर्दैवाने या मृतांमध्ये महिला आणि बालकांची संख्या जास्त आहे. तर वृद्ध देखील या आपत्तीचे शिकार झाले आहेत. त्यामुळे ही जीवघेणी आपत्ती कधी टळेल अशी चिंता आपत्तीत अडकलेल्या नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तर प्रशासन देखील आपल्या परीने आपत्तीग्रस्तांना मदत करत आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

