Share

भीमा नदी कोपली : २९ गावातल्या साडे सात हजारावर कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: भीमा नदीला आलेल्या पुरामुळे सोलापूर जिल्हा प्रशासनानं २९ गावातल्या साडे सात हजारावर कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. पंढरपूर शहरातही पुराचं पाणी शिरलं असून, शहरातल्या सुमारे अठराशे कुटुंबांना विविध ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे.

उजनी आणि वीर धरणातील विसर्ग वाढल्याने भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पूर रेषेत येणाऱ्या तालुक्यातील ४८ गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच पंढरपूर शहरातील व्यास नारायण, अंबाबाई पटांगण , बाबासाहेब आंबेडकर नगर, गोपाळपूर रोड, कुष्ठरोग वसाहत त्याचबरोबर भजनदास चौक, तांबडा मारुती चौक, महात्मा फुले पुतळा या परिसरात पुराचे पाणी आलेले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातल्या पर्लकोटा, पामुलगौतम तसंच इंद्रावती नद्यांना पूर आला असून, भामरागड गावात पाणी शिरलं आहे.सांगली इथं जिल्हा कारागृहात पाणी शिरल्यामुळे सुमारे चारशे कैदी कारागृहाच्या इमारतीवर अडकून पडले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचं काम आज सकाळी सुरू झालं.

दरम्यान, जिल्ह्यातल्या पूरस्थितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे आज दुपारी पाहणी करणार आहेत, त्यानंतर ते सांगली इथं आढावा बैठक घेणार असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला असून, कोयना धरणाचे दरवाजे १३ फुटावर स्थिर करण्यात आले आहेत.औरंगाबादच्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक मंदावली आहे. धरणाचा पाणीसाठा ६५ टक्क्यांहून अधिक झाला असून सध्या सुमारे एकतीस हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे.

मराठवाड्यासह राज्यात काल अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. औरंगाबाद तसंच परभणी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. जालना जिल्ह्यात आज पहाटेपासूनच ढगाळ वातावरण असून हलका पाऊस सुरु आहे.

पूरग्रस्त भागात सुविधेसाठी यंत्रणांनी सतर्क रहा : फडणवीस

भारताविरुद्ध कारवाईचा विचारही करू नका, अमेरिकेने पाकला सुनावले

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!