टीम महाराष्ट्र देशा : पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायमच आहे. पंचगगा नदीने पातळी ओलांडल्याने कोल्हापूरमध्ये सर्वत्र पाणी पसरले आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्यात गंभीर पुरस्थिती निर्माण झाली आहे. एक लाख 32 हजार 360 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले एसून यामध्ये 16 जणांचे बळी गेले आहेत. या तिन्ही जिल्ह्यात बचावकार्य सुरू असून अजून तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
सांगली,सातारा, कोल्हापूरमध्ये पुरपरिस्थीती गंभीर
नदीच्या पाणी पातळीत एक फुटांची घट झाली असली तरी राधानगरी धरणाचे बंद झालेले चार दरवाजे पुन्हा उघडल्याने चिंता कायम आहे. धरणातून 13000 क्युसेकने विसर्ग सुरू असून राधानगरी कणकवली रोड पुन्हा बंद झाला आहे. पावसाचा जोर वाढल्यास कोल्हापुरातील पूरस्थिती मध्ये अजून वाढ होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूरस्थितीची पाहणी करणार आहे.
सकाळी नौदलाच्या दोन विमानातून एका बोटींसह २२ जणांचे पथक आणि गोवा कोस्टगार्डचे एक हेलिकॉप्टर बोटीसह कोल्हापुरात आले असून सकाळपासूनच एनडीआरएफ आणि लष्कराच्या जवानांनी बोटीद्वारे पूरग्रस्तांना मदत देण्यास सुरुवात केली आहे. पुरात अडकलेल्या अनेकांना सुरक्षा स्थळी हालवण्यात आले आहे.
कराडची पूर परस्थिती जैसे थे असून शहरातील पाणी कालपासून पातळीत वाढ अथवा कमीही झाली नाही.कराडच्या आसपासचा भागही पाण्याखाली गेला असुन तेथेही पाणी भरुन राहिले आहे. कोयनेतील संपर्क यंत्रणा कालपासुन बंद असुन पुणे बेंगलोर हायवे अजुनही बंदच आहे. पाऊसाची रिपरिप सुरुच आहे. सातारा जिल्ह्यातील बिकट पुर परिस्थिती असून तांबेगाव तालुक्यामध्ये एनडीआरएफच्या टिमने केला लोकांचा बचाव केला आहे.
जम्मू काश्मीरला जहागिरी समजणारे महबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला होणार बेघर
कांबळ्या, हे बग मला काय सापडलंय!
शहीदांचे कुटुंबीय आणि जखमींना मिळणारे एकरकमी अनुदान २५ लाखांहून १ कोटीवर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

