🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या पक्षांतराचे वारे वाहत आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत.
याच पार्श्वभूमीवर पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही लाभार्थ्यांना प्रधानमंत्री जन आरोग्य-आयुष्मान भारत योजनेतंर्गत गोल्डन कार्ड वितरित करण्यात आले, त्यानंतर सुमारे अडीच हजार लाभार्थ्यांना कार्ड देण्यात आले.

तसेच या वेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, गोरगरिबांना आधार देणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या योजना थेट लाभार्थ्यांपर्यन्त पोहचिण्यासाठी आपला प्रयत्न आहे. जनतेच्या थेट दारात जाऊन आम्ही हा लाभ देत आहोत, आयुष्मान योजना गोल्डन कार्ड मार्फत लाभार्थ्यांना कोणत्याही आजारांवर पाच लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार होणार आहे. हा आगळावेगळा कार्यक्रम आपल्या मतदारसंघात होतोय याचा आनंद आणि अभिमान वाटतो. राज्यात काम करत असताना प्रत्येक घटकाच्या आरोग्याची काळजी घेणं हे आपल कर्तव्य आहे हे ओळखून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत त्यांच्यासाठी असणाऱ्या योजना पोहचिण्यासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यकर्ते मेहनत घेत आहेत याबद्दल त्यांनी सर्वांचे मनापासून कौतुक केले.

दरम्यान, , निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची ‘जन आशिर्वाद यात्रा’ सुरु आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची ‘महाजनादेश यात्रा’ सुरु आहे. सेना-भाजपच्या यात्रा मुख्यमंत्रिपदासाठी असून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांची ‘शिवस्वराज्य यात्रा’ ही रयतेचा आवाज बुलंद करणार आहे.
धनंजय मुंडेंची मोर्चेबांधणीला सुरुवात ; पत्नी राजश्री मुंडे प्रचाराच्या मैदानात
बेजबाबदार राज्यसरकार अन् निर्लजम सदासुखी महापालिका’
३५अ’च काय संपूर्ण ३७० कलम हटवण्याचा मोदी सरकारचा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
