Share

कॉंग्रेसला भविष्यात चांगले दिवस येणार ; थोरातांनी व्यक्त केला विश्वास

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारने २०१४ च्या लोकसभा निवडणूकीमध्ये भरघोस यश मिळाले आहे. आघाडीला लोकसभा निवडणुकीला लाजिरवाण्या पराभवाला समोर जावे लागले आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मोठ्या प्रमाणात सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत इनकमिंग सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर बोलताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले, काँग्रेसमधून लोक बाहेर पडताहेत ही वस्तुस्थिती मान्य आहे, परंतु त्यामुळेच नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना पक्षामध्ये संधी मिळते आहे. असे म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसलाही नवी पालवी फुटेल, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना दिला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पदाधिका-यांच्या मेळाव्यात थोरात बोलत होते. तसेच पुढे बोलताना थोरात म्हणाले की, पक्षहितासाठी योगदान देणाऱ्यांना भविष्यात चांगले दिवस येतील, याची खात्री बाळगा, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.

दरम्यान, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!