🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या जोरदार पक्षांतर सुरु आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था ही दयनीय झाली आहे. या पक्षांतरावरून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोठ विधान केले आहे.
सोलापूरमध्ये बोलताना शिंदे यांनी ‘साखर कारखानदारांची अडचण केली जात आहे. त्यांची कर्जे नियमित करण्याची आशा दाखवून त्यांना भाजप प्रवेश दिला जात आहे. हे स्वमर्जीने जात आहेत असं नाही. त्यांच्या अडचणीमुळे काहीजण पक्षांतर करीत आहेत. पण ते जास्त काळ टिकणार नाही’ अस विधान केले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी तत्कालीन विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तसेच आताही कॉंग्रेस आणि भाजपचे अनेक नेते भाजप आणि सेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीसाठी ही धोक्याची घंटा आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
