Share

राष्ट्रवादीला धक्यावर धक्का ; उल्हासनगरच्या आमदार ज्योती कालानीही भाजपच्या वाटेवर?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :  लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवामुळे आघाडीतून मोठ्या प्रमाणात आउटगोइंग सुरु आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु असतानाचा उल्हासनगरच्या आमदार ज्योती कालानीही भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आले आहे.

आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आता याचदरम्यान राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ देखील राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आले. येत्या ३० जुलैला चित्रा वाघ ये भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती वृत्तवाहिनिंनी दिली.

याचदरम्यान उल्हासनगरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार ज्योती कालानी या भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त आले आहे. ज्योती कालानी यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. कालानी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीनंतर कालानी यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधान आले आहे.

विशेष म्हणजे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ज्योती कालानी भाजपच्या कुमार आयलानी यांचा पराभव केला. त्यावेळी महिला आमदार म्हणून कलानी निवडून आल्या होत्या.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!