Share

ज्या पक्षाला नेता नाही, धोरण नाही, नेतृत्त्व नाही ते युद्ध कसे लढणार : बावनकुळेंची कॉंग्रेसवर टीका

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कॉंग्रेसवर सडकून टीका केली आहे. वर्धा येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ज्या पक्षाला नेता नाही, धोरण नाही, नेतृत्त्व नाही, कार्यकर्ते डिमॉरलाईज झाले आहेत. ज्या पक्षाचं सैनिकच डिमॉरलाईज झाले असतील, ते युद्ध कसे लढणार? अशा शब्दात कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे.

बावनकुळे कॉंग्रेसविषयी बोलताना “बाळासाहेब थोरात हे नवे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना असं काही सांगावं लागणार आहे. मात्र, खासगीत त्यांनाही पक्ष अडचणीत असल्याचे माहित आहे. सध्या पक्षाला नेता नाही, धोरण नाही, नेतृत्त्व नाही, कार्यकर्ते डिमॉरलाईज झाले आहेत. ज्या पक्षाचं सैनिकच डिमॉरलाईज झाले असतील, ते युद्ध कसे लढणार? सैन्यच नसल्याने बुथवर काम करायला कुणीही उपलब्ध नाही. ज्या पक्षाला सैनिकच नाहीत, तो पक्ष हरणारच आहे. हा इतिहास आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

तसेच पुढे बोलताना “काँग्रेसमध्ये राष्ट्रीय नेतृत्त्व कुणी करावं, याबद्दल एक-एक महिना निर्णय होत नाही. ज्या पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष नाही, त्या पक्षाचे हेच हाल होणार आहे. त्यामुळेच मोठ्या नेत्यापासून अगदी गावातील कार्यकर्ते देखील काँग्रेस सोडून भाजप आणि शिवेसेनेत प्रवेश करत आहे. मोदींवर विश्वास आहे. मोदी सर्वोत्कृष्टपणे देश पुढे नेत आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील वाईट दिवसांतही राज्य चांगलं ठेवण्याचं काम केलं आहे असंही बावनकुळे म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!