Share

शहीदांचे कुटुंबीय आणि जखमींना मिळणारे एकरकमी अनुदान २५ लाखांहून १ कोटीवर

Published On: 

मुंबई : वीरमरण किंवा अपंगत्व आलेल्या सैनिकांना देण्यात येणाऱ्या एक रकमी आर्थिक मदतीत भरीव वाढ करण्याला राज्य मंत्रिमंडळानं मंजूरी दिली आहे. या निर्णयानुसार हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना पूर्वी मिळणाऱ्या २५ लाख रुपयांऐवजी आता एक कोटी रूपये मदत मिळेल. तर जखमी होऊन दिव्यांग झालेल्या सैनिकांना १५ लाखांऐवजी ६० लाख रूपये मदत मिळणार आहे.

औरंगाबाद इथल्या राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी कांचनवाडी भागातल्या जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था – वाल्मीच्या परिसरातली ३३ एकर जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. या विद्यापीठासाठी यापूर्वी कांचनवाडी इथेच १७ एकर जागा देण्यात आली असून, राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या निर्णयानंतर या विद्यापीठासाठी आता ५० एकर जागा उपलब्ध झाली आहे.

समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांच्या मानधनाच्या फरकाची रक्कम राज्याच्या निधीतून देण्याला मान्यता, सर्व शिक्षा अभियानांतर्गत अपंग समावेशित शिक्षण उपक्रमातल्या शिक्षकांच्या मानधनात दीड हजार रुपये वाढ, तसंच महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी चार हजार कोटी रुपयांचं अंतरिम कर्ज उभारण्यासाठी शासन हमी देण्यालाही या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!