🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत झालेल्या सामन्यात न्युझीलंड विरुद्ध हार पत्करत भारतला आपला विश्वचषकातील प्रवास थांबवावा लागला. न्यूझीलंड विरुद्ध भारत केवळ १८ धावांनी पराभूत झाला. या सामन्यात आघाडीच्या फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे संघाला पराभवाच्या खाईत जावे लागले. या पराभवानंतर भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून खंत व्यक्त केली आहे.
We failed to deliver as a team when it mattered, 30 minutes of poor cricket yesterday & that snatched away our chance for the cup. My heart is heavy as I’m sure yours is too.The support away from home was incredible.Thank you all for painting most of uk blue wherever we played ????????
— Rohit Sharma (@ImRo45) July 11, 2019
रोहित शर्मा म्हणाला की, न्युझीलंड विरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना पहिली ३० मिनिटांच्या सुमार खेळीमुळे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले. या पराभवामुळे माझे मन भरून आले आहे. आणि तुमचे देखील आले असेल. या संपूर्ण विश्वचषकात समर्थकांनी खूप साथ दिली आणि इंग्लंडच्या भूमीला निळा रंग आणला त्यासाठी मी आभारी आहे.
दरम्यान संपूर्ण विश्वचषकात रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी करत सलग ५ शतकं ठोकली. तर या विश्वचषकात रोहित शर्माने याने श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगाकारा याचा सलग ४ शतकांचा रेकॉर्ड मोडला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत रोहित शर्माकडून चाहत्यांच्या आणि संघाच्या मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला अवघी १ धाव काढता आली. त्यामुळे रोहित शर्माने आपल्या सुमार फलंदाजी बाबत खंत व्यक्त केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
