Share

सरकारची जलयुक्त शिवार ही फसवी योजना, गैरव्यवहार झाल्याची कबुली सरकारनेचं दिली – राष्ट्रवादी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरकारवर निशाणा साधला. फडणवीस सरकारने मोठा गाजावाजा करत सुरू केलेली ‘जलयुक्त शिवार’ ही फसवी योजना असल्याचं आता उघड झालंय, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या NCP या आॅफिशियल ट्विटर अकाउंट वरून केली आहे.

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचे काम सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप, टीका-टिप्पणी सुरु आहे. याचदरम्यान राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरकारवर निशाणा साधला. बाळासाहेब चौधरी यांनी पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेत अनियमितता झाली असल्याची तक्रार केली होती. विधानपरिषदेत आज प्रश्नोत्तराच्या तासात या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला असताना जलसंधारण विभागाने जलयुक्त शिवाराच्या कामात अनियमितात झाल्याची कबुली दिली आहे, असे राष्ट्रवादीने म्हंटले आहे.

इतकेच नव्हे तर देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा गाजावाजा करत सुरू केलेली ‘जलयुक्त शिवार’ ही फसवी योजना असल्याचं आता उघड झालंय. जलयुक्त शिवारच्या कामात गैरव्यवहार झाल्याची कबुली आता सरकारनेच दिली आहे, असेही राष्ट्रवादीने म्हंटले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!