टीम महाराष्ट्र देशा : हा माझा शेवटचा सत्कार आहे. चांगला पाऊस पडून शेतकरी सुखी झाल्याशिवाय सत्कार स्वीकारणार नाही. असे वक्तव्य नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केले आहे. कर्जत येथील सत्कार समारंभात ते बोलत होते.
लोकसभ निवडणूक नुकतीच पार पडली, अहमदनगर लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपकडून उमेदवारी लढवत विजय मिळवला. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर, कर्जत येथे त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
त्यावेळी, येथील सत्कार हा माझा शेवटचा आहे. जोपर्यंत चांगला पाउस पडत नाही आणि माझा शेतकरी सुखी होत नाही तोपर्यंत विजयाचा सत्कार स्वीकारणार नाही. असे सुजय विखे यांनी म्हंटले.
इतकेच नव्हे तर, ज्यांना सत्कार करायचा असेल, त्यांनी दुष्काळाच्या कामांसाठी लागणाऱ्या निधीत सत्काराची रक्कम द्यावी. मुख्यमंत्री निधीसाठी ही रक्कम देऊन या कार्याला हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
