टीम महारष्ट्र देशा : राज्याच्या विद्युत आणि ऊर्जा खात्याने मराठवाडा आणि विदर्भातील उद्योजकांना दिलासा देणार निर्णय घेतला आहे. २०२४ पर्यंत मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगसमूहांना राज्य सरकारकडून विद्युत शुल्कमाफी देण्यात आली आहे.
यासंबंधीची माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. यावेळी बावनकुळे म्हणाले की, मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगांना चालना मिळण्यासाठी आणि उद्योजकांना काहीशी सवलत मिळण्यासाठी राज्य सरकारकडून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे महसूलावर ६०० कोटी रुपयांचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तर उद्योजकांसाठी ही विद्युत माफी २०२४ पर्यंत असणार आहे.

