टीम महाराष्ट्र देशा : नारायण राणेंनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. नौ होल्ड्स बार्ड असं या इंग्रजी आत्मचरित्राचं नाव आहे. हे ९ मे रोजी ते प्रकाशित होणार आहे. आता राणेंनी त्यांच्या न झालेल्या भाजप प्रवेशाबद्दल देखील मोठा खुलास त्यांच्या आत्मचरित्रात केला.
चंद्रशेखर बावनकुळेंनी मुलीच्या लग्नाचं निमंत्रण मला दिलं होतं. तेव्हा त्या लग्नात माझी मुख्यमंत्र्यांशी भेट झाली. त्यांनीही मला भाजपा प्रवेशाचं आश्वासन दिलं. मुख्यमंत्र्यांनी मला वर्षा बंगल्यावरती भेटण्यासाठी बोलावलं. नंतर काही दिवस सीएम संपर्कात होते. त्याचदरम्यान माझी नितीन गडकरींशीही चर्चा झाली. मला पक्षात घेतल्यास पाठिंबा काढण्याची शिवसेनेनं धमकी दिली. सेनेच्या धमक्यांमुळे भाजपा नेतृत्व अस्वस्थ झालं आणि माझा पक्ष प्रवेश रखडला. तर दुसरीकडे मुख्यमंत्रीही म्हणाले होते की, नारायण राणेंना योग्य सन्मान दिला जाईल. अस नारायण राणेंनी लिहील आहे.
त्याचबरोबर, राणेंना त्यांच्या राजकीय वजनानुसार मंत्रिपद द्यावं लागेल, असंही मुख्यमंत्र्यांनी भाजपा नेत्यांना सांगितलं. त्यानंतर नंबर दोनचे नेते चलबिचल झाले. पक्षाच्या भल्यासाठी भाजपात प्रवेश करा, असं सांगणाऱ्या मंत्र्यांना माझा विसर पडला. माझ्या घरी टॅक्सीमधून फेऱ्या मारणारे अचानक गायब झाले. त्या ज्येष्ठ नेत्यांना कळलं माझा प्रवेश झाल्यास त्यांच्याकडची मोठी खाती माझ्याकडे येतील. त्यांना दुसऱ्याचे घर वाचवायला गेल्यास स्वतःचे घर खाली होईल, याची भीती सतावू लागली आणि मला पक्षात घेतलं नाही. अस देखील नारायण राणेंनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये लिहिले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
