टीम महाराष्ट्र देशा : भाजप बरोबरचं शिवसेनेला देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता लक्ष करू लागले आहेत. मंगळवारी राज ठाकरे यांनी मुंबईतील काळाचौकी परिसरात असलेल्या शहीद भगतसिंग मैदानात सभा घेतली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही दोन माणसं या देशासमोरील सर्वात मोठ संकट आहेत. त्यामुळे या दोन माणसांना निवडणूक देऊ नका असे आवाहन त्यांनी जनतेला केले. तर शिवसेनेलाही मतदान करू नका असे राज ठाकरे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी प्रत्यक्ष निवडणुकीत भाग न घेता मोदी सरकार विरोधात बंड पुकारले आहे. आपल्या ऑडीओ – व्हिजुअल सभांमधून राज यांनी मोदी सरकारच्या खोट्या विकासाचा बुरखा फाडला आहे. तर भाजप सरकारला सत्तेवर आणू नका असे आवाहन ते जनतेला करत आहेत. राज ठाकरे यांची भाजप विरोधी भूमिका असली तरी राज हे भाजपचा मित्र पक्ष शिवसेनेबाबत आतापर्यंत काहीच बोलत नव्हते. मात्र आता राज यांनी शिवसेनेला पण मतदान करू नका असे आवाहन केले आहे.
यावेळी राज म्हणाले की, मोदींची सत्ता न येण्यासाठी भाजपाला मतदान करु नका आणि त्यामुळेच भाजपाच्य सोबत असलेल्या शिवसेनेला मतदान का करु नका, कारणं त्यांना मत देणं म्हणजे या दोघांना मत देण आहे, असे म्हणत राज यांनी मुंबईतील पहिल्याच सभेत शिवसेनेला देखील लक्ष केले. तसेच राज पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे आज ईडी अन् सीबीआयच्या धमक्या देत आहेत, धाडी घालत आहेत. पण, उद्या तुम्हीही विरोधी पक्षात जाणार आहात. त्यामुळे उद्या जेव्हा तुमच्यावरही धाडी पडतील ना, तेव्हा समजेल की नोटाबंदी हा या देशातील सर्वात मोठा स्कॅम असेल.असे सूचक विधान राज यांनी यावेळी केले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
