Share

प्रकाश आंबेडकरांची आघाडी म्हणजे भाजपची ‘बी टीम’ अजित पवारांची टीका

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : भाजप सरकारला या निवडणुकीत धुळीत मिळवण्यासाठी राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि इतर छोट्या पक्षांनी एकत्र येत महाआघाडी केली आहे. आज मुंबई येथे कॉंग्रेस-राष्ट्रवादीने संयुक्त पत्रकार परिषद घेवून या महाआघाडीची घोषणा केली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप- सेना युती विरोधात चांगलीच निंदा केली. तसेच प्रकाश आंबेडकरांवर देखील अप्रत्यक्ष रीत्या निशाणा साधला.

यावेळी अजित पवार म्हणाले की, गेल्या 5 वर्षात भाजपची केंद्रात आणि राज्यात सत्ता असून देखील 25 टक्के उमेदवार हे भाजपला काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून घेऊन त्यांना उमेदवारी द्यावी लागली आहे. तसेच सध्या देशात तोडाफोडीचे राजकारण सुरु आहे मात्र याआधी कधीही देशात असलं राजकारण झालेलं पाहिलं नाही. असे पवार म्हणाले.युतीचा पराभव करायचा असेल तर मतभेद विसरा आणि जातीयवादी पक्षांना दूर सारा असे आवाहन देखील पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेला केले आहे.

जे या महाआघाडीत सामील नाहीत ते भाजपला अप्रत्यक्षरित्या पाठींबा देत असून त्यांनी ‘बी टीम’ स्थापन केली आहे असा निशाणा पवार यांनी प्रकाश आंबेडकरांवर अप्रत्यक्षरित्या साधला. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी ही भाजपची ‘बी टीम’ आहे असा टोला नाव न घेता अजित पवार यांनी प्रकश आंबेडकरांना लगावला आहे.

दरम्यान आज झालेल्या महाआघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दांडी मारली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!