🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : गेल्या साडेचार वर्षात मतदार संघात सुमारे 1400 ते 1500 कोटी रुपयांची कामे मंजूर करुन आणली आहेत. त्यापैकी अनेक कामे झाली आहेत. अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. तर, काही कामांचा आराखडा बनविण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे साडेचार वर्षात जे पेरले आहे, ते एप्रिल महिन्यात उगवणार आहे असं म्हणत आगामी लोकसभा निवडणुकीत आपला विजय पक्का असल्याचा डाव शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत खासदार आढळराव पाटील गुरुवारी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना गटनेते राहुल कलाटे, महिला संघटिका सुलभा उबाळे, नगरसेवक अमित गावडे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट आदी उपस्थित होते.
दरम्यान,आगामी निवडणुका युती करून लढविण्याचा सेना-भाजपने निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दोन्ही पक्षातील नेत्यांचे बळ वाढले असून विजय निश्चित करण्यासाठी तसेच कोणताही दगाफटका टाळण्यासाठी आता नेत्यांचे तसेच कार्यकर्त्यांचे मनोमिलन होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची भेट घेणार असल्याचं देखील स्पष्ट केलं आहे.
https://www.youtube.com/watch?v=ZDYSgivQ3pU&t=169s

