Share

वंचित बहुजन आघाडीच्या तोफा उद्या नगरमध्ये धडाडणार 

Published On: 

🕒 1 min read

नगर : आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर  राज्यात गेल्या काही दिवसात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते  अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर व ‘एमआयएम’चे नेते  असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीची सत्ता परिवर्तन जाहीर सभा शुक्रवारी दुपारी २ वाजता स्टेशन रोडवरील क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे.
असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ एकत्र  राज्यातील निवडणूका लढण्याच्या तयारीत आहे.जागावाटप करताना सन्मानजनक वागणूक न मिळाल्याने तसेच १२ जागा सोडण्यास आघाडीने नकार दिल्याने वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसऱ्या बाजूला भाजपला सत्तेवरून हटविण्यासाठी  राष्ट्रवादी , काँग्रेस आणि इतर पक्ष आपापसात  भाजप विरुद्ध आघाडी करत आहेत.मात्र   वंचित बहुजन आघाडीने एका पेक्षा एक सरस उमेदवार घोषित करत यासर्व पक्षांच्या तोंडचे पाणी पळविले आहे.

https://www.youtube.com/watch?v=ZDYSgivQ3pU

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!