Share

मी मंत्री होताच यांच्या पोटात दुखू लागले ,सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर डागली तोफ

Published On: 

🕒 1 min read

कोडोली : शरद जोशी यांच्या संघटनेत उडी घेतल्यानंतर गेली 30 – 32 वर्षे मी शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी काम केले. वाड्या – वस्तीवर गेलो. पायाला फोड आले, पण आम्ही कधी जाहिरातबाजी व फोटोबाजी केली नाही. कारण आम्ही काम करणारे व चळवळीतील कार्यकर्ते होतो. याच जीवावर मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपद बहाल केले. मात्र मी मंत्री होताच यांच्या पोटात दुखू लागले. मी मोठा होईल असे संकुचित मनाच्या नेत्याला वाटू लागले. स्वत:च्या स्वार्थासाठी मला मंत्रिपदावरून हाकला नाहीतर युतीतून बाहेर पडेन असे ते मुख्यमंत्र्यांना धमकावू लागले. पण फडणवीस यांना सर्व माहीत होते. त्यांनी माझी पाठराखण केली. त्यामुळे आज मी मंत्रिपदावर आहे अशा शब्दांतराज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावरनाव न घेता टीका केली.

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वारणा – कोडोली येथे पार पडलेल्या शेतकरी कष्टकरी परिषदेत रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर जहरी टीका केली. कोडोलीत रयत क्रांती संघटनेचा पहिला वर्धापन दिन आणि ऊस परिषदेच्या निमित्ताने कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे जोरदार शक्तीप्रदर्शन केलं . मंत्री खोत हे हातकणंगले लोकसभा मतदार संघातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघात 200 किमी दूरवर मी फडणवीसांच्या आदेशाने लढलो. शेतक-यांसाठी केलेल्या कामाच्या जोरावर मी 4 लाख 80 हजार मते घेतली व निसटता पराभव झाला. पण यांनी हतकणगंले सोडून शेजारच्या सांगलीत जाऊन लढण्याची धमक दाखवावी व माझ्याएवढी मते घेऊन दाखवावीत, असे शेट्टींचे नाव न घेता त्यांना आव्हान दिले.

राजू शेट्टी यांच्याकडून केवळ प्रसिध्दीसाठीच टीका- सदाभाऊ खोत

वेगळे पक्ष असणारे खोत, जानकर, मेटे भाजप आमदार कसे ?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!