Share

नितेश राणेंविरोधात शिवसैनिकांची तक्रार; ‘त्या’ ट्वीटमुळे शिवसैनिक आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भाजप आमदार नितेश राणे यांच्याविरोधात शिवसैनिकांनी मुंबईतील काळाचौकी वरळी आणि भोईवाडा पोलीस ठाण्यात नितेश तक्रार दाखल केली आहे. नितेश राणे यांनी केलेल्या ट्वीटमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी करण्यात आली असून, दोन समाजात तेढ निर्माण केल्याची तक्रार शिवसैनिकांनी केली आहे.

नितेश राणे यांनी बुधवारी वीर जिजामाता उद्यानाचे नाव रातोरात बदलून हजरत पीर बाबा अशी कोनशीला लावून बदलले असल्याचे ट्वीट केले होते. या ट्वीटसह त्यांनी फोटोदेखील पोस्ट केला होता. राणे यांच्या ट्वीटमधील माहिती दिशाभूल करणारी असल्याचे शिवसैनिकांनी म्हटले आहे.

नितेश राणे यांनी ट्वीटद्वारे खोटी माहिती पसरवली असल्याचे म्हटले आहे. नगरसेवक अरविंद भोसले यांनी ही तक्रार दाखल केली आहे. राणे यांच्या ट्वीटरवरील बेताल वक्तव्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी भोईवाडा पोलिस ठाणे येथे निवेदन दिले. नगरसेवक अनिल कोकीळ यांनी काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

नेमके प्रकरण काय?

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थातच राणी बाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  उद्यानातील नव्या फलकावरून गैरसमज पसरवले जात असतानाच आता भाजप नेते नितेश राणे यांनी यावर ट्वीट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला. गेल्या अनेक वर्षांपासून राणीबागेत हजरत हाजी पीर बाबा यांचा दर्गा आहे. या दर्ग्याची माहिती देणाऱ्या सूचना फलकावर प्रशासनाने ‘हजरत हाजी पीर बाबा राणी बाग’ असा उल्लेख केल्याने यावर आक्षेप घेतला जात आहे. यावरच नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही टीका केली होती.

काय होते ट्वीट?

तमाम हिंदूच्या मॅांसाहेब जिजामाता भोसले यांच्या नावाने असलेले वीर जिजामाता उद्यानाचे नाव रातोरात बदलून हजरत पीर बाबा अशी कोनशीला लावून बदलले आहे. आता सत्तेच्या लाचारीसाठी बाळासाहेबांच्या शिवसेनाचं नाव बदलणार का? असा सवाल नितेश राणे यांनी ट्वीट करत केला होता.

मात्र प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार मुळात उद्यानाचे नाव राणी बाग नसून वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय असे आहे. पूर्वीच्या काळापासून लोक उद्यानास राणीबाग म्हणून संबोधत आले आहेत. त्यामुळे जिजामाता उद्यानातील या जुन्या दर्ग्याचे नाव ‘हजरत हाजी पीर बाबा राणीबाग’ असे पडले आहे. या दर्ग्याची माहिती देणारा सूचना फलक उद्यानात लावण्यात आला आहे. उद्यानात प्रवेश करताना मुख्य प्रवेशद्वारावर आजही ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय’ असे नाव आहे. त्यात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे कुणीही यावर आक्षेप घेण्याचे कारण उरत नाही. असे म्हटले आहे.त्यामुळे नितेश राणे यांनी गैरसमज पसरवणारी माहिती दिल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!