Share

‘मुलंच आहेत, थोडी प्यायली तर काय झालं?’; काँग्रेस आमदाराच पोलीस ठाण्यात आंदोलन

Published On: 

🕒 1 min read

राजस्थान : जोधपूर जिल्ह्यातील शेरगड विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसच्या महिला आमदार मीना कंवर पोलीस स्थानकामध्ये जमीनीवर बसून आंदोलन केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र त्यांचे आंदोलन करण्यामागचे कारण अनोखे असल्याने सध्या याप्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. मीना यांच्या एका नातेवाईकावर वाहतूक पोलिसांनी दारु पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. मात्र याचा निषेध म्हणून मीना आणि त्यांचे पती उम्मेद सिंह चंपावत सोबत पोलीस स्थानकामध्ये ठिय्या आंदोलन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, मीना यांच्या नात्यातील मुलावर कारवाई करण्यात आल्यानंतर मुलाने केलेली चूक मान्य करण्यास तयार नव्हत्या. उलट  आमदार मीना या दारु पिऊन गाडी चालवणाऱ्या त्या तरुणाची बाजू मांडताना दिसत आहेत. “सर्वांचीच मुलं पितात. मुलं आहेत काय फरक पडतो जर त्यांना थोडीफार दारु प्यायली तर?”, असे म्हणत मीना त्या मुलाला सुडण्याची विनंती करताना या व्हिडीओत दिसत आहेत.

यावेळी या महिला आमदाराचा पती आणि पोलिसांमध्ये चांगलाच शाब्दिक वाद देखील झाला. परंतु काही काळानंतर डीसीपींच्या मध्यस्थीमुळे हे प्रकरण शांत झाले आणि काँग्रेसच्या महिला आमदार मीना कंवर आणि यांचे पती उम्मेद सिंह चंपावत यांना घरी जाण्यास सांगितले. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!