🕒 1 min read
पंजाब : पंजाब काँग्रेसमध्ये मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच चिघळत चालले आहे. पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणारे आणि नंतर परत येणारे नवज्योत सिंग सिद्धू यांनी आता पत्र लिहून नवीन मागणी केली आहे. सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी वेळ मागितली असून त्यांना पत्रही लिहिले आहे.
Punjab Congress Pres Navjot Sidhu writes to party's interim pres Sonia Gandhi stating 'priority areas that Punjab govt must deliver upon.' He also seeks time from her 'to present to her a Punjab Model with 13 point agenda to be part of Congress Manifesto for 2022 Assembly polls.' pic.twitter.com/1dxByOa6B9
— ANI (@ANI) October 17, 2021
पत्रामध्ये सिद्धू यांनी १३ मुद्द्यांकडे लक्ष वेधले असून यापैकी १२ मुद्दे हे ड्रग्ज, कृषी, वीज, सरकार आणि वीज कंपन्या यांच्यातील करार रद्द करणं तसेच इतर काही गोष्टींमध्ये न्याय मिळावा असे आहेत. मागासवर्गीयांचा विकास, रोजगार, सिंगल विंडो सिस्टिम, महिला आणि तरुणांचे सबलीकरण, दारु आणि अवैध खाणकाम याविरोधात कारवाई यावरही त्यांनी पत्रामार्फत लक्ष वेधले आहे.
दरम्यान, सिद्धू यांनी राजीनामा मागे घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी हे पत्र लिहिले असून मागील काही दिवसात त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, पंजाबचे प्रभारी हरीश रावत आणि पक्षाचे महासचिव केसी वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केली होती. तसेच आपल्या समस्याही त्यांनी पक्षासमोर मांडल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
- आगामी महापालिका निवडणूकांसंदर्भात गडकरी आणि फडणवीस यांच्यात चर्चा
- ३७० कलम रद्द करुनही काश्मीरप्रश्न सुटलेला नाही- मोहन भागवत
- ‘कारवाई करणार असेल तरच यावं अन्यथा…’; उदयनराजेंचे ईडीला पुन्हा एकदा आव्हान
- कुणी ‘शेण खा’ म्हटलं तर तू खातोस का? शिवसेना आमदारांचा राष्ट्रवादीच्या आमदाराला खोचक सवाल
- मोदींची घोषणा! अयोध्येच्या तीर्थयात्रेसाठी भाजप सरकार ५० हजारांची आर्थिक मदत करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
