Share

‘…मग राणे, राज ठाकरे पक्ष सोडून का गेले?, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल

Published On: 

मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या वक्तव्यांवरुन जोरदार टोलाही लगावला होता. ‘मी एका जबाबदारीने मुख्यमंत्रिपद स्वीकारलं आहे. केवळ वडिलांना दिलेल्या वचनामुळे हे पद मला स्वीकारावं लागलं आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, असे वचन मी बाळासाहेबांना दिले होते. त्यानुसार भाजपने शब्द पाळला असता व शिवसैनिक मुख्यमंत्री झाला असता तर कदाचित आज मी राजकीय जीवनातून बाजूलाही झालो असतो’, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे.

तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर मग सुभाष देसाई, एकनाथ शिंदे आणि दिवाकर रावते यांना मुख्यमंत्री का नाही केलं? असा सवाल करतानाच तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर नारायण राणे आणि राज ठाकरे शिवसेना सोडून का गेली असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी सकाळीच पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे. मुख्यमंत्रिपदाची त्यांची महत्त्वकांक्षा होती, ती त्यांनी पूर्ण केली. आता त्याला तत्वज्ञानाची जोड देत आहेत. ते त्यांनी थांबवावं. शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्दच पाळायचा होता तर सुभाष देसाई, दिवाकर रावते, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचे होते.’

‘मुख्यमंत्री व्हायचे नव्हते तर नारायण राणेंना पक्षातून का बाहेर जावे लागले? राणेंना तर पक्षप्रमुख व्हायचे नव्हते. राज ठाकरेंना पक्षातून का जावे लागले? त्यामुळे दोष देणे थांबवा. आता दोन वर्ष झाले आहेत. किती दिवस तेच तेच बोलणार. राजकारणात महत्त्वकांक्षा असणे गैर नाही. पण त्याला तत्वज्ञानाची जोड देणे कितपत योग्य आहे?’ असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!