🕒 1 min read
मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. आजच्या सामनाच्या रोकठोकमधून त्यांनी या भेटीचा तपशील लिहिला आहे. यावेळी राहुल गांधींसोबतच्या चर्चेत राष्ट्रीय राजकारणासंबंधी एक मोठी खंत बोलून दाखविल्याचं राऊतांनी रोखठोकमध्ये म्हटलं आहे. तृणमूल काँग्रेस आणि आप मतांचे विभाजन घडवून भाजपचाच फायदा करुन देत आहेत, अशी सल त्यांनी राऊतां यांच्याजवळ बोलू दाखवली आहे.
आप आणि तृणमूल काँग्रेस मतांचे विभाजन घडवून भाजपचाच फायदा करून देत आहेत. गोव्यात काही संबंध नसता तृणमूल व आप आली आणि त्यांनी काँग्रेसचे आमदार फोडले. पैशांचा वापर त्यासाठी सगळेच करतात ही खंत गांधींनी बोलून दाखवल्याचंं संजय राऊतांनी रोखठोकमध्ये म्हंटल आहे.
आप आणि तृणमूल काँग्रेस मतांचे विभाजन घडवून भाजपचाच फायदा करून देत आहेत. गोव्यात काही संबंध नसता तृणमूल व आप आली आणि त्यांनी काँग्रेसचे आमदार फोडले. पैशांचा वापर त्यासाठी सगळेच करतात ही खंत श्री. गांधींनी बोलून दाखवली. ती खरीच आहे. तृणमूल व आम आदमी पक्ष काँग्रेसला गिळत आहे. त्यांनी भाजपचे निदान शेपूट तरी तोडावे. काँग्रेस कमजोर करणे व त्यातून स्वतः वाढणे हे शेवटी भारतीय जनता पक्षालाच सोयीचे ठरते, असंही रोखठोकमध्ये म्हंटलं आहे.
ममता बॅनर्जी यांनी बंगाल जिंकले, पण संपूर्ण देशात त्यांना स्वीकारार्हता नाही व श्री. केजरीवाल हे पेंद्रशासित दिल्लीचेच मांडलिक राजे. हे कोणीच समजून घ्यायला तयार नाही. या सगळ्यांना श्री. राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी नकोत. कारण देशाचे नेते होण्याची क्षमता त्यांच्यात आहे. श्री. मोदी व शहांचेही तेच मत आहे. विरोधकांची एकजूट होऊ नये व काँग्रेस कमजोरच राहावी हे भाजपला वाटणे व इतर विरोधकांनाही तेच वाटणे यात फरक आहे, असं राऊतांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- छापेमारीनंतर पुरावा मिळाल्यावर त्याला राजकीय स्वरूप देणं चुकीचं; फडणवीसांची प्रतिक्रिया
- मुलगा जेरबंद होताच केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्यावर राजीनाम्याचा दबाव
- अजित पवारांशी संबंधित आयकर विभागाच्या छाप्यांचा भाजपाशी संबंध जोडणे हास्यास्पद – पाटील
- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची दलित संघटनांची मागणी
- उद्धव साहेबांची उपस्थिती आमच्यासाठी बाळासाहेबांचा आशिर्वाद- नितेश राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

