Share

गुळ व्यापारी आणि शेकऱ्यांच्या वादावर सतेज पाटील यांचे वक्तव्य; म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये आज(९ ऑक्टो.)माध्यमांशी संवाद साधतांना राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ‘सर्व शेतकरी माझ्याकडे येऊन गेलेले आहेत, मी व्यापाऱ्यांना सांगितलेलं आहे की तोडगा काढायचा आहे. कुठल्याही परिस्थिती तोडगा निघेल, अन्यथा कायदेशीर कारवाई व्यापाऱ्यांवर करून, हा तोडगा काढला जाईल. त्यामुळे सध्या चर्चा सुरू आहे व सकारात्मक चर्चा होऊन शेतकऱ्यांना गुळाचा व्यापार चालू करण्याची जी अडचण होती ती सोडवली जाईल.’ असे वक्तव्य केले आहे.

यावेळी पाटील म्हणाले की,’आत्तापर्यंत त्यांच्यातच चर्चा सुरू होती परंतु आज माझ्याकडे हा विषय आल्यानंतर मी ताबडतोब मिटवायला सांगितला आहे. गुळाचे नुकसान झालेले नाही, व्यापार थांबलेला आहे. तो आज सुरू झाला तर गुळाची आवक होईल आणि निश्चितपणे शेतकऱ्याला जे देयक देणं गरजेचे आहे ते मिळेल.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’पूरग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आलेली मदत अत्यल्प असल्याने शेतकरी संघटना संतप्त झाल्या आहेत. त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. याकडे लक्ष वेधले असता मंत्री पाटील म्हणाले राज्यात अजूनही १० हजार हेक्टर शेतजमिनीचे पंचनामे अपूर्ण आहेत. राज्य शासनाने पूरग्रस्तांना अजिबात मदत केली नाही, असे होऊ नये यासाठी एसडीआरच्या नियमाप्रमाणे मदत केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांच्या मदतीने बदल करणार असल्याचे सांगितले आहे. शेतकऱ्यांना आणखी मदत मिळणार असून त्यासाठी काही कालावधी जावा लागेल’ असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!