मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखाना तसेच निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर इन्कम टॅक्स विभागाकडून छापेमारीची कारवाई सुरु आहे. गुरुवारी संध्याकाळी अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा मारला. मुंबईतील नरिमन पॉईंटच्या कार्यालयावर छापेमारीची कारवाई झाली. अजित पवार आणि त्यांच्या 3 बहिणीच्या कारखान्यांवर सकाळपासून छापेमारीची कारवाई सुरु आहे. त्या बद्दल अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती.
या प्रकरणी आता माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडले आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदीत भ्रष्टाचार झाला आहे. अजित पवार खोटे सांगत आहेत. ते खोटी माहिती देत आहेत, असा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला आहे.
त्या म्हणाल्या, ‘जरंडेश्वर साखर कारखान्याचा व्यवहार नियमाप्रमाणे झालेला नाही. सत्तेचा दुरुपयोग करून कारखाना ताब्यात घेतला आहे. ते दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. अजित पवारांवर इन्कम टॅक्सच्या विभागाच्या धाडी जरंडेश्वरसाठीच पडल्या आहेत. कोर्टातही माझी लढाई सुरुच आहे. साखर कारखान्यांचे भागधारक शेतकरी आहेत. त्यांना कोर्टाकडून न्याय मिळणार, असा विश्वास शालिनीताईंनी व्यक्त केला.
‘साखर कारखाना लिलावात काढायची गरज नव्हती. कारखाना बुडीत नव्हता. कारखान्याकडे आठ कोटींच्या ठेवी होत्या. त्यातून तीन कोटींची रक्कम फेडता येणे शक्य होते. दरम्यान, अजित पवारांना यांना कोणतीही निवडणूक लढवण्यासाठी यापुढे केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाने बंदी घालावी अशी मागणीही त्यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- साखरेच्या नावावर महाराष्ट्राला लुटलं, तिच साखर पवार कुटुंबाला संपवणार; राणेंचा घणाघात
- लवकरचं ‘दूध का दूध पानी का पानी होईल; अजितदादांची प्रतिक्रिया
- ‘आता राष्ट्रवादीवाले बॉलिवूडची पण भांडी घासायला लागले’, निलेश राणेंचा घणाघात
- ‘लखीमपुर घटनेवर मी प्रतिक्रिया दिली या रागातून सत्ताधाऱ्यांनी ‘ती’ कारवाई केली असावी’
- १०५ आमदार असूनही ते एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काम करतात; राऊतांनी फडणवीसांना डिवचलं


