कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. सोमय्या यांनी मुश्रीफांविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांच्यावर अजून एक गंभीर आरोप करण्यात आला आहे.
हा आरोप किरीट सोमय्या नाही तर ताराराणी आघाडीचे नेते आणि माजी महापौर सुनील कदम यांनी केला आहे. हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांच्या मदतीने कोल्हापूर महानगरपालिकेची ड्रिम वर्ल्ड वॉटर पार्कमधील 15 गुंठे जमीन बेकायदेशीररित्या बळकावली आहे. महत्वाची बाब म्हणजे या प्रकरणात हसन मुश्रीफ यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी मदत केल्याचा आरोपही कदम यांनी केला आहे.
मुश्रीफ आणि पाटील यांनी राजकीय पदाचा गैरवावर करुन अधिकाऱ्यांवर दबाव आणत ही जमीन मुश्रीफ यांचे पुत्र साजिद मुश्रीफ यांच्या नावानं केली. त्यानंतर या जमिनीवर गृहनिर्माण प्रकल्प उभा केलाय. याच परिसरात अजून 33 गुंठे जमीनही आपल्याच नावावर करण्याचा साजिद मुश्रीफ यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही कदम यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वीजग्राहकांच्या सेवेला व वीजबिल वसुलीला सर्वोच्च प्राधान्य – नितीन राऊत
- मी विधानपरिषदेचा आमदार असल्याने संपूर्ण राज्य हाच माझा मतदारसंघ आहे – मुख्यमंत्री
- लखीमपूर हिंसाचार प्रकरणी संजय राऊत घेणार राहुल गांधींची भेट
- ‘शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेशमधील सरकार करत आहे’
- केंद्रीय पथकाकडून होणार नुकसानग्रस्त भागांची पाहणी, केंद्रीय मंत्री भागवत कराडांचे सुतोवाच!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
