Share

सत्य कधीच लपत नाही! सचिन वाझेचा खोटारडेपणा झाला उघड; मुख्यमंत्र्यांचाही विश्वासघात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अँटिलिया स्फोटक कारप्रकरणात आता एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकणातील प्रमुख संशयित बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने मोठा बनाव रचला होता. वाझेचा संपूर्ण कट उधळला गेला आहे. या प्रकरणामध्ये सचिन वाझे याने मुख्यमंत्र्यांचाही विश्वासघात केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाची माहिती आता समोर येत आहे. वाझेने खोटारडेपणा अखेर उघडकीस आला आहे.

सचिन वाझेने अँटिलिया स्फोटक कार प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची दिशाभूल केल्याचे उघड झाले आहे. एनआयएने न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्तांचा जबाब आहे. ‘अँटिलिया कार प्रकरणात कोणताही दहशतवादी अँगल नाही, हिरेनचा मृत्यू ही आत्महत्याच आहे, हे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत वाझेने पटवून सांगितलं होतं. याचा तपास आपल्याकडेच सोपवावा अशीही त्याने मागणी केली होती’, असे आयुक्तांच्या जबाबात म्हटले आहे.

या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत 5 मार्चला बैठक झाली होती. त्या बैठकीत इतर अधिकारी ही हजर होते. त्यावेळी सचिन वाझे यांने मुख्यमंत्र्यांना माहिती दिली की, जी गाडी सापडली आहे, त्यात कोणताही दहशतवादी अँगल नाही. तसेच हिरेन याचा मृत्यू हा आत्महत्या आहे, हे पटवून सांगू लागला. तपास मीच करतो अशी ही विनंती वाझे याने केली. ही बैठक मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी व्हीआयपीरूममध्ये पार पडल्याचे ही सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या जबाबात म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!