Share

स्वातंत्र्य दिनाच्या पर्वाला राज्यपाल कोश्यारी दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर

Published On: 

पुणे: स्वातंत्र्यदिनाच्या पर्वाला राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पुण्यातील सिंहगडला भेट देणार आहेत. तसेच राज्यपालांच्या हस्ते १५ ऑगस्टला विभागीय कार्यालय येथे ध्वजारोहण आयोजित केला असल्याचे विभागिय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले आहे.

दरम्यान यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी पायीच शिवनेरी गड सर केला. त्यांचा उत्साह यावेळी अलोकनीय होता. यामुळे पायी शिवनेरी सर करणारे ते पहिलेच राज्यपाल ठरले आहेत. यानंतर ते सिंहगडही सर करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी शिवजन्मस्थळाचे तसेच शिवाजी महाराज यांच्या पाळण्याचे पूजन केले. त्यांच्या हस्ते याठिकाणी वृक्षारोपनही करण्यात आले. वयाच्या ७९ वर्षीही पायी चालत राज्यपाल कोश्यारी यांनी शिवनेरी सर केला. त्यांच्या या उत्साहाचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे. दरम्यान १५ ऑगस्टरोजी ध्वजारोहण तसेच १६ ऑगस्टला ते सिंहगड सर करणार असल्याचे कळले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!