Share

‘दगडूशेठ’ गणपतीची प्राणप्रतिष्ठापना आणि मिरवणूक थाटात

Published On: 

🕒 1 min read

पुणे : गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… च्या जयघोषात पुष्परथातून निघालेल्या दिमाखदार आगमन मिरवणुकीने वाजत गाजत श्री राजराजेश्वर मंदिरात दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२६ व्या वर्षानिमित्त आयोजित उत्सवाचा प्रारंभ हजारो भक्तांच्या साक्षीने झाला. श्री राजराजेश्वर मंदिरात सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी मोरगाव येथील महान गाणपत्य श्री गणेश योगींद्राचार्यांच्या परंपरेतील डॉ.धुंडीराज पाठक शास्त्री यांच्या हस्ते विधीवत श्रींची प्राणप्रतिष्ठापना झाली.

‘आला आला आला माझा गणराज आला’

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, माणिक चव्हाण, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, दत्तोपंत केदारी,सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, राजूशेठ सांकला, माजी आमदार मोहन जोशी यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. मुख्य मंदिरापासून सकाळी ८.३० वाजता श्रीं च्या आगमन मिरवणुकीला प्रारंभ झाला. श्रीं ची विलोभनीय मूर्ती डोळ्यात साठविण्यासोबतच दर्शनासाठी भक्तांनी चौका-चौकात गर्दी केली. मंदिरापासून निघालेल्या मिरवणूक तांबडी जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौक, नगरकर तालीम चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडई मार्गे उत्सव मंडपात आली. मिरवणुकीमध्ये अग्रभागी देवळणकर बंधूंचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, मयूर बँड, प्रभात बँड, दरबार बँड, महिलांचे मानिनी ढोल-ताशा पथक यांसह शालेय विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. मुख्य पूजा मिलींद राहुरकर आणि नटराज शास्त्री गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली झाली.

अशोक गोडसे म्हणाले, अकराव्या शतकाच्या सुरुवातीला साकारण्यात आलेल्या राजराजेश्वर या महादेव मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसा वास्तूचा दर्जा दिला आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात ट्रस्टतर्फे साकारण्यात आलेली ही प्रतिकृती भाविकांकरीता विशेष आकर्षण ठरणार आहे. श्री राजराजेश्वर मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार ७५ बाय १०० फूट असून ९० फूट उंची आहे. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना आणखी सुटसुटीत करण्यात आली असून यामुळे भाविकांना सहजतेने दर्शन घेता येणार आहे.

ॠषिपंचमीनिमित्त २५ हजार महिला करणार सामुदायिकरित्या अर्थवशीर्ष पठण
ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे शुक्रवार, दिनांक १४ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजता २५ हजार महिला सामुदायिकरित्या अर्थवशीर्ष पठण करणार आहेत. यावेळी फिनोलेक्स ग्रुपचे प्रकाश छाब्रिया, रितू छाब्रिया, वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच, शुक्रवारी रात्री १० ते २ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील समस्त वारकरी बंधू वारकरी गजर करीत गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!