Share

मुंबई इंडियन्सच्या इशान किशनला वाढदिवशी मिळाले मोठे गिफ्ट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून यष्टीरक्षण कोण करणार याचे प्रश्न सामना सुरु झाल्यानंतर मिळाले आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडु इशान किशनला धवनने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण करण्याची संधी दिली आहे.

महत्वाची बाब म्हणजे १८ जुलै हा इशान किशनचा वाढदिवस असल्याने आजचे पदार्पण हे त्याच्यासाठी वाढदिवसाचे सर्वात मोठे गिफ्ट ठरले आहे. याच वर्षी इंग्लंडविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. काही महिन्यातच एकदिवसीय पदार्पण करण्याची संधी किशनला मिळाली. त्या सामन्यात इशान किशनने ३२ चेंडुत ५६ धावा करत सामनाविराचा पुरस्कार पटकावला होता. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ४ षटकार लगावले होते.

स्थानिक क्रिकेटमध्ये इशान किशन हा झारखंड संघाचा कर्णधारपद भुषवतो तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत असतो. विजय हजारे करंडक स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात किशनने ९४ चेंडुत १९ चौकार आणि ११ षटकारासंह १७३ धावांची वादळी खेळी साकारली होती. याच सामन्यात त्याने यष्टीमागे ७ झेलही घेतले होते. मात्र आयपीएल २०२० पासुन तो प्रकाश झोतात आला. आणि थेट भारतीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी उघडले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!