🕒 1 min read
मुंबई : आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी सर्व संघ तयारीला लागले आहेत. निर्धारीत कार्यक्रमानुसार भारतात आयोजीत ही स्पर्धा कोरोना प्रादुर्भावामुळे युएईमध्ये आयोजीत करण्यात आली आहे. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा खेळवीण्यात येणार आहे.
टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमिवर भारताचे माजी क्रिकेटपटु आणि क्रिकेट समालोचक संजय मांजरेकर यांनी त्यांचे मत माडंले आहे. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे सलामीवीर विराट कोहली आणि रोहित शर्मा हे असतील असे ते म्हणाले. तर तिसऱ्या क्रमांकासाठी त्यांनी मुंबई इंडियन्सचा फलंदाज सुर्यकुमार यादवला पसंती दर्शवली आहे.
तर यष्टीरक्षकासाठी त्यांनी रिषभ पंतच्या जागी संजु सॅमसन आणि इशान किशन या दोन्ही नावाचा उल्लेख केला. यावेळी ते म्हणाले. कसोटी सामन्यापेक्षा टी-२० सामन्यात यष्टीरक्षकाचे मदत्व कमी आहे. त्यामुळे मी संजुला पसंती देईन. कारण त्याला सुर सापडला तर तो सर्वोत्तम कामगीरी करुन संघाचा विजय निश्चीत करु शकतो असे मांजरेकर म्हणाले. विराट आणि रोहितेने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अखेरच्या सामन्यात सलामीची भूमिका पार पाडली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- टीम इंडियाविरुद्धच्या ‘त्या’ वक्तव्यावर रणतुंगाला डिसील्वाकडुन घरचा आहेर
- ‘द्रविडने भारताचा मुख्य कोच बनू नये’ जाफरने केलं मोठ विधान
- कोरोना प्रादुर्भावामुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत घेण्यात आला ‘हा’ निर्णय
- राज्यात आज 10,458 रुग्णांना डिस्चार्ज, तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक नेते पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचेच -अजित पवार


