Share

ऑफलाईन परीक्षा घेणे अनिवार्य; अमित देशमुख यांची काळजी घेण्याची ग्वाही

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा कोरोना परिस्थिती बघता ऑनलाइन घ्याव्यात अथवा काही काळासाठी स्थगित कराव्यात अशी मागणी करण्यात येत होती. मात्र, या परीक्षा ऑफलाईन घ्याव्या लागणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, विद्यार्थ्यांची काळजी घेण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली आहे.

या संदर्भात मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही मागणी केली होती. त्यावर देशमुख यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याबाबत केंद्रीय कौन्सिल ने परवानगी दिलेली नाही. तसेच विद्यापीठाच्या परीक्षा धोरणाशी हे सुसंगत नाही. मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी यापूर्वीच या संदर्भातील याचिका फेटाळली आहे. यामुळे  ऑफलाईन परीक्षा घेणे अनिवार्य आहे. परीक्षा कालावधीत सर्व विद्यार्थ्यांच्या कोवीड सुरक्षेची काळजी घेण्याची ग्वाही विद्यापीठ देत आहे.’

आगामी १० तारखेपासून या परीक्षा सुरू होणार आहेत. मात्र परीक्षांबाबत लवकर निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. यात काही विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्यास विरोध केला होता. तर काही विद्यार्थी पुढे ढकलण्याची मागणी करत होते. अखेर या परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!