🕒 1 min read
कोल्हापूर:- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कालपासून देशवासियांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण, कालपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिल्या जाणार आहेत.
कोरोना लसीकरण मोहिमेचा प्रारंभ म्हणजे, कोरोना विरोधातील लढाईचा सर्वात महत्वाचा टप्पा आहे. यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज असून ही लसीकरण मोहीम राज्यात प्रभावीपणे राबविली जाईल, असे सूतोवात राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं. तसेच केंद्र शासनाने कोरोना विरोधातील लस मोफत देण्याच्या यादीत दारिद्र रेषेखालील घटकांचा समावेश प्राधान्याने करावा अशी मागणी राज्यमंत्री यड्रावकर यांनी केली आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग थांबवण्यासाठी प्रतिबंधात्मक लस निर्मिती करण्यावर काम सुरु होतं. कित्येक संस्था, शास्त्रज्ञ लसनिर्मिती करण्यासाठी प्रयत्न करत होते. संशोधकांचे हे प्रयत्न यशस्वी झाले असून आता संपूर्ण देशात प्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात झाली आहे. या लसीकरणाच्या कार्यक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल उद्धाटन केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद देखील साधला.
महत्वाच्या बातम्या
- नागरिकांनी औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ असाच उल्लेख करावा-सुभाष देसा
- हनीट्रॅप : ‘मुंडेंना मी ओळखतही नाही, त्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचा प्रश्नच नाही’
- श्री क्षेत्र तुळापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध- छगन भुजबळ
- पुढील लोकसभा निवडणुकीत मागील मताधिक्याचा विक्रम तोडला जाईल : चंद्रकांत पाटील
- राज्यात बर्ड फ्लू नियंत्रणात; भीती नको, काळजी घ्या – सुनील केदार


