Share

IPL Auction 2023 | सॅम करन ठरला IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू , ‘या’ संघाकडून खेळणार

Published On: 

🕒 1 min read

IPL Auction 2023 | नवी दिल्ली : आयपीएल 2023 साठी लिलाव सुरू झाला आहे.10 संघांचे मालक आणि प्रशिक्षक कर्मचारी कोची येथील हॉटेल ग्रँड हयात येथे उपस्थित आहेत. एकूण 67 जागेसाठी लिलाव होणार आहे. दरम्यान, सॅम करन आतापर्यंतचा सर्वात महाग खेळाडू ठरला आहे. सॅम करनची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. टी-20 विश्वचषकात तो टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. तसेच, अंतिम सामन्यात तो इंग्लंडचा सामनावीर ठरला. करण आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

पंजाब किंग्जने सॅम करनला 18.50 कोटी रुपयांना विकत घेतले. याआधी केएल राहुल हा सर्वात महागडा खेळाडू होता. लखनऊने त्याला 17 कोटी रुपयाला घेतले होते. याशिवाय तो लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. यापूर्वी, ख्रिस मॉरिसला 2021 मध्ये राजस्थानने 16.25 कोटींना खरेदी केले होते. करन हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडूही ठरला. सॅम करन याआधीही पंजाब किंग्जकडून खेळलेला आहे.

आयपीएलच्या मागील हंगामातही हा संघ सहाव्या स्थानावर होता. पंजाबने 14 पैकी 7 सामने जिंकले. पण खराब रनरेटमुळे हा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचू शकला नाही. मात्र, आता सॅम करनला विक्रमी किमतीत खरेदी करत या संघाने जय्यत तयारी सुरू केली आहे. तसेच सिकंदर रझाची फिरकी गोलंदाजी आणि मॅच फिनिशिंग क्षमता पंजाबला अधिक मजबूत करेल.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!