🕒 1 min read
Sharad Pawar | पुणे : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून कर्नाटक सरकारकडून चिथावणीखोर कृत्य आणि वक्तव्ये होत असल्याने सीमावाद उफाळून आला आहे. कर्नाटकातील बेळगाव येथील बागेवाडी येथे मंगळवारी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. यावर महाराष्ट्रातील विरोधीनेते आक्रमक झाले आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कर्नाटक सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
“कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्राच्या तसेच मराठी भाषिक जनतेवर हल्ले करणं, त्यांना त्रास देणं थांबवण्यात आलं नाही तर परिस्थिती चिघळू शकते. महाराष्ट्रातील जनतेच्या संयमाचा बांध फुटला तर त्याला सर्वस्वी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकार जबाबदार असेल”, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला.
“देशाला ज्यांनी संविधान दिलं. थोर महात्म्याच्या स्मरणाच्या दिवशी जे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर घडलं ते निषेधार्ह आहे. हे प्रकरण काही आठवड्यापासून एका वेगळ्याच स्वरुपात नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा आहे”, असा दावाही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केलाय.
“येत्या ४८ तासांत हे प्रकरण संपलं नाही, तर माझ्यासकट सर्वांना बेळगावात तेथील लोकांना धीर देण्यासाठी जावं लागेल. कर्नाटकाच्या सीमेवर हे घडत असेल तर लोकांचा उद्रेक होऊ शकतो. तो होऊ नये, हा आमचा प्रयत्न आहे,” असेही शरद पवार म्हणालेत. त्याचबरोबर “उद्यापासून संसदीय अधिवेशन सुरु होत आहे. राज्यातील खासदारांना सांगणार आहे की भूमिका मांडा. कोणी कायदा हातात घेतला, तर त्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि कर्नाटकला घ्यावी लागेल,” असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Rohit Patil | “कन्नड गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध, सत्तारुढ पक्षांनी…” ; रोहित पाटील आक्रमक!
- Devendra Fadanvis | कर्नाटकात महाराष्ट्राच्या वाहनांवर झालेल्या दगडफेकीनंतर देवेंद्र फडणवीसांचा बोम्मईंना फोन
- Sanjay Raut | “महाराष्ट्र पेटला तर…” ; कर्नाटक वादावरुन संजय राऊत यांची शिंदे सरकारवर जहरी टीका
- Sharad Pawar | महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक झाल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “उद्यापासून…”
- Eknath Shinde | सर्वसामान्य व्यक्ती सत्तेच्या सर्वोच्च स्थानी बसली हे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच – एकनाथ शिंदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
