🕒 1 min read
अहमदाबाद: आज विजय हजारे ट्रॉफी 2022 (Vijay Hazare Trophy 2022) स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. गुजरात मधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे हा सामना खेळायला जात आहे. या सामन्यामध्ये महाराष्ट्र आणि सौराष्ट्र हे दोन्ही संघ विजेते पदासाठी लढताना दिसणार आहे. महाराष्ट्राचा फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि सौराष्ट्राचा कर्णधार जयदेव उनाडकर (Jaydev Unadakar) यांच्या खेळीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कोणता खेळाडू कुणावर मात करतो हे पाहण्यासाठी चाहते आतुर आहे. कारण या स्पर्धेमध्ये दोन्ही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे.
विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy 2022) अंतिम सामन्यामध्ये ऋतुराज आणि जयदेवच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष
आजच्या अंतिम स्पर्धेत अनेक जिंकून सौराष्ट्र संघाच्या कर्णधार जयदेव उनाडकर यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर प्रथम फलंदाजी करण्यासाठी महाराष्ट्र संघातील ऋतुराज गायकवाड मैदानावर उतरला आहे. ऋतुराज गायकवाडची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. कारण विजय हजारे ट्रॉफीमध्ये ऋतुराजने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने उपांत्य फेरीपूर्वी उत्तर प्रदेशविरुद्ध आणि उपांत्य फेरीमध्ये शतक झळकावले आहे. या स्पर्धेमध्ये ऋतुराज महाराष्ट्रासाठी सुरुवातीचे काही सामने खेळू शकला नव्हता. पण संघामध्ये आल्यानंतर ऋतुराजने विरोधी संघाला चांगलीच धूळ चारली आहे. ऋतुराजने चार सामन्यांमध्ये तब्बल 552 धावा केल्या आहेत.
दुसरीकडे सौराष्ट्राचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज जयदेव उन्हाळकरने देखील या स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. जयदेव उनाडकर आयपीएलमध्ये आपल्या उत्कृष्ट खेळीसाठी ओळखला जातो. या स्पर्धेमध्ये त्यांनी नऊ सामन्यात 18 विकेट घेतल्या आहे. त्याचबरोबर त्याने या स्पर्धेत आत्तापर्यंत 281 धावा केले आहेत. जयदेव उनाडकरने उपांत्य फेरीमध्ये तब्बल चार बळी घेतले होते.
जयदेव उनाडकर आणि ऋतुराज गायकवाड हे दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये आपल्या चांगल्या कामगिरीसाठी ओळखले जातात. या परिस्थितीत आज कोण कोणावर मात करेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
