🕒 1 min read
Sanjay Raut | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावर प्रतिक्रिया देत असताना भाजप (BJP) नेते आणि महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना अश्रू अनावर झाले. यावर आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत म्हणाले, “उदयनराजे भोसले यांचे अश्रू आम्ही पाहीले आहेत, ते छत्रपतींचे वंशज आहेत. उदयनराजेंचे जे अश्रू आहेत ते महाराष्ट्राचे अश्रू आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनात ही भावना आहे, की शिवरायांचा हा अपमान सहन करण्यापेक्षा मरण का नाही आलं, ही त्यांनी महाराष्ट्राची भावना व्यक्त केली आहे.
यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली आहे. “शिंदे आणि त्यांचं सरकार हे एका हतबलतेने त्यांचा अपमान पाहते आणि परत शिवप्रताप दिन साजरा करत आहेत हे ढोंग आहे”, असं संजय राऊत म्हणालेत.
काय म्हणाले होते उदयनराजे?
देश परदेशातून लोक येतात तेव्हा त्यांच्या कानावर शिवाजी महाराजांचं नाव पडतं. कशाला पाहिजे, जाऊ द्याना कशाला हवं बेगडी प्रेम. रेल्वे टर्मिनसला तरी का नाव द्यायचं. शिवजयंती तरी करा साजरी करायची?, असे सवाल करत हे बोलताना उदयनराजेंना अश्रू अनावर झाले. त्यांनी तोंडाला रुमाल लावला. कंठ दाटला. मेलो असतो तर बरं झालं असतं. अशा व्यक्तीविरोधात कारवाई करत नसाल तर कुणालाही शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असं देखील ते म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :
- PM Kisan Yojana | PM किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्डसोबत ‘हे’ डॉक्युमेंट पण करावे लागेल लिंक
- Sanjay Raut | मुख्यमंत्र्यांना शिवरायांना अभिवादन करण्याचा अधिकार नाही – संजय राऊत
- IIFA 2023 | अबुधाबीमध्ये पुन्हा एकदा रंगणार आयफा अवॉर्ड सोहळा, ‘हे’ स्टार्स करणार कार्यक्रम होस्ट
- Vikram Kirloskar Death | ‘टोयोटा’ची वेगळी ओळख निर्माण करणारे, विक्रम किर्लोस्कर यांचे वयाच्या 64 व्या वर्षी निधन
- Winter Care Tips | सावधान! हिवाळ्यामध्ये स्वेटर घालून झोपत असाल तर होऊ शकतात ‘या’ आरोग्याच्या समस्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
