बंगलोर: भारतातील लोकप्रिय टोयोटा (Toyota) कंपनीचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर (Vikram Kirloskar) यांचे निधन (Death) झाले आहे. वयाच्या 64 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम किर्लोस्कर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. विक्रम किर्लोस्कर हे टोयोटा किर्लोस्कर मोटर लिमिटेडचे उपाध्यक्ष होते. भारतात टोयोटा कारची लोकप्रियता निर्माण करण्याचे संपूर्ण श्रेय विक्रम किर्लोस्कर यांना जाते. त्यांनी आपल्या कुशल नेतृत्वाने आणि कामगिरीने टोयोटाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. विक्रम किर्लोस्कर यांच्या कुटुंबामध्ये पत्नी गीतांजली किर्लोस्कर आणि मुलगी मानसी किर्लोस्कर आहे.
विक्रम किर्लोस्कर यांनी एमआयटी मधून मेकॅनिकल इंजिनियरची पदवी संपादन केलेली होती. त्यांनी ARAI, CII आणि SIAM मध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलेले आहे. विक्रम किर्लोस्कर हे किर्लोस्कर समूहाच्या चौथ्या पिढीचे प्रमुख होते. त्याचबरोबर त्यांनी किर्लोस्कर सिस्टीम लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक या पदांवर देखील काम केले होता.
29 नोव्हेंबर 2022 रोजी टोयोटा किर्लोस्कर मोटारचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे दुखद निधन झाले. विक्रम किर्लोस्कर यांच्यावर तीस नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता बेंगलोर येथील हेब्बल स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. टोयोटा कंपनीने ट्विट करून त्यांच्या निधनाची बातमी जाहीर केली आहे.
We extend our deepest sympathies to his family and friends. Last respect can be paid at Hebbal Crematorium, Bengaluru, on 30th November 2022 at 1pm. [2/2] pic.twitter.com/2XuhErUnzD
— Toyota India (@Toyota_India) November 29, 2022
ट्विटमध्ये कंपनीने आवाहन केले आहे की,”या दुःखद प्रसंगांमध्ये त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी सगळेजण प्रार्थना करा, असे आवाहन आम्ही तुम्हाला करत आहोत. विक्रम किर्लोस्कर यांचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी यांच्या प्रति आम्ही संवेदना व्यक्त करत आहोत.
महत्वाच्या बातम्या
- Winter Care Tips | सावधान! हिवाळ्यामध्ये स्वेटर घालून झोपत असाल तर होऊ शकतात ‘या’ आरोग्याच्या समस्या
- IND vs NZ | “पंतला आता विश्रांती देण्याची…”; संजू सॅमसनला संघातून वगळल्याने शशी थरूर संतापले
- AIDS/HIV | तीन वर्षांपासून HIV प्रतिबंध आणि उपचारात कोणतीही प्रगती नाही – Unicef
- IND vs NZ | भारत आणि न्यूझीलंडमधील तिसऱ्या वनडे सामन्यात संजू सॅमसन प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर
- Zakir Khan | झाकीर खानच्या स्टँड-अप कॉमेडी शो ‘तथास्तु’चा ट्रेलर रिलीज


