Share

Ajit Pawar | “राज्यपाल म्हणायचे, अजितजी अभी बस, अभी मुझे जाना है” ; अजित पवारांनी सांगितला किस्सा

Published On: 

🕒 1 min read

Ajit Pawar | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात राज्यभरात निदर्शने करण्यात येत आहेत. राज्यपालांनी आपल्या पदावरून पायउतार व्हावे, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. या सर्व परिस्थितीत राज्यपालांना पदावरून हटवण्यासाठी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका (पीआयएल) देखील दाखल करण्यात आली आहे. दरम्यान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले, “ज्ञानेश्वर माऊली संजीवनी सोहळ्याच्या निमित्ताने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विचारांमधील अंधार दूर होऊ दे, त्यांच्या वक्तव्यामधला गोंधळ संपवू दे, महाराष्ट्राच्या राज्यपालांना सद्बुद्धी लाभू दे, अशी प्रार्थना मी करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी चिड येणारे वक्तव्य केले. या वक्तव्याच्या मी तीव्र निषेध करतो. राज्यपाल महोदय वारंवार असं का बोलतात, का वागतात. सत्तारुढ मान्यवर यावर का गप्प बसतात?. हे महाराष्ट्र राज्याला पडलेलं कोड आहे.”

“मी राज्यपालांना विरोधी पक्षनेता म्हणून भेटू शकतो. मी त्यांना उपमुख्यमंत्री होतो तेव्हा देखील भेटायला जायचो. मला बऱ्याचदा राज्यपाल म्हणायचे, अजितजी अभी बस, अभी मुझे जाना है. मी म्हणायचो वरिष्ठांना सांगा आणि जा. त्यांना जायचे आहे आणि मात्र वरिष्ठ परवानगी देत नाहीत. त्यामुळे राज्यपाल अशाप्रकारची वक्तव्य करत आहेत का?, अशा प्रकारची शंका घ्यायला जागा निर्माण होत आहे,” असे अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!