🕒 1 min read
Sanjay Raut | मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याची मॅनेजर दिशा सालियान (Disha Salain) हिचा बलात्कार करुन खून झाल्याचा दावा भाजप (BJP) नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला होता. यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपाचे नेते आणि महिला नेत्यांनी आरोप केले होते, त्यांनी आदित्य ठाकरेंची माफी मागायला हवी. केंद्रीय तपास यंत्रणेचा अहवाल समोर आला आहे, तर तोंडाची थुंकी का उडवत होता. एक तरुण नेत्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, दिशा सालियन हत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याची चर्चा आहे. आदित्य ठाकरेंचा हात असल्यानेच याप्रकरणाची दाबादाबी केली. तशी लोकांची चर्चा आहे. सचिन वाझेने हे संपूर्ण प्रकरण मॅनेज केलं, असा गौप्यस्फोट राणेंनी केला होता.
महत्वाच्या बातम्या :
- NCP vs BJP | राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का!, राष्ट्रवादीच्या 200 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
- Aditya Thackeray | “आधी प्रकल्प पाठवले, आता मंत्रिमंडळ पाठवलं”; आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल
- UPI Update | PhonePe, GooglePe आणि Paytm वापरणाऱ्यांसाठी लवकरच येणार ‘हा’ बदल
- Sanjay Raut | “सरकार माझ्या जीवाशी खेळत आहे, काही बरं वाईट…”; संजय राऊतांचे गंभीर आरोप
- Urfi Javed | अशी कोणती ही फॅशन?, कपडे सोडून उर्फीने समोर ठेवले दोन ग्लास


